एटापल्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व टीडीसी केंद्राचे उद्घाटन
एटापल्ली : एटापल्ली येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, एटापल्ली तसेच टीडीसी (TDC) केंद्राचे उद्घाटन

एटापल्ली आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व टीडीसी केंद्राचे उद्घाटन
जिल्हा:प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार
एटापल्ली : एटापल्ली येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, एटापल्ली तसेच टीडीसी (TDC) केंद्राचे उद्घाटन मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक येथील संचालक मा. सैनुजी गोटा यांच्या हस्ते संपन्न झाले.
या उद्घाटन प्रसंगी तालुका काँग्रेस नेते प्रज्वल नागुलवार, नगरसेवक नामदेव हिचामी, अक्षय पुन्घटी, रामा तुमराठी, दिवाकर गावडे, सेवानिवृत्त वनपाल मानापूरे जी, देवानंद हिचामी, गणेश हिचामी, केंद्र चालक इंगळे, ग्रेडर यांच्यासह एटापल्ली केंद्रातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवरांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी संस्था व टीडीसी केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा, मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळणार असल्याने परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्था पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.




