मानोरी–मुखेड / मानोरी बु., ता. येवला | प्रतिनिधी : प्रविण पाटील
मानोरी बु.च्या विकासाला गती; ५.१४ कोटींच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी

मानोरी–मुखेड / मानोरी बु., ता. येवला | प्रतिनिधी : प्रविण पाटील
नाशिक / येवला प्रतिनिधी : प्रविण पाटील
मानोरी बु.च्या विकासाला गती; ५.१४ कोटींच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी
मानोरी बु. (ता. येवला) येथे गावाच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध कामांची पाहणी करण्यात आली. खडकीनाला मानोरी ते कोपरगाव हायवेपर्यंत ५ कोटी १४ लक्ष रुपये निधीतून सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा, वेळेत पूर्तता व सुरक्षिततेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
मानोरी गावाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा हा रस्ता अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता. पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात धुळीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळे ग्रामस्थांना मजबूत, टिकाऊ व सुरक्षित रस्त्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या पाहणीदरम्यान उपस्थित कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधून गावातील पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शेतकरी प्रश्न व इतर मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. या समस्या सोडवण्यासाठी टप्प्याटप्प्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
गावात सुरू असलेल्या व भविष्यात होणाऱ्या विकासकामांबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आगामी काळातही मा. छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. विकासाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सभापती संजय बनकर, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, नितीन गायकवाड, भगवान ठोंबरे, योगेश गांगुर्डे, सरपंच नंदराम शेळके, उपसरपंच नवनाथ शेळके, दत्तात्रय शेळके, तानाजी वावधणे, देवराम शेळके, सदाशिव शेळके, आप्पासाहेब पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



