टॉप न्यूज़दुनियादेशमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मदत अजूनही मिळाली नाही! शासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल!

शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मदत अजूनही मिळाली नाही! शासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल!

शेतकरी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी – ज्ञानेश्वर महादु मोरे, लोणार

रब्बी हंगामाची पेरणी सुरू झाली असताना, सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचलीच नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, शासनाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अतीवृष्टी अनुदान जमा करून “शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू” असे आश्वासन महसूल विभागाकडून देण्यात आले होते. मात्र त्या आश्वासनांचा फुगा फुटला आहे. लोणार तालुक्यातील बिबी मंडळातील हजारो शेतकरी आणि भुमराळा गावातील शेकडो शेतकरी आजही या मदतीपासून वंचित आहेत.

शासनाने अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात अनेकांना हेक्टरी फक्त 8,500 रुपये, तर काही भागात तर 5,000 रुपयांपेक्षाही कमी रक्कम देण्यात आली तसेच
रब्बी हंगामातील पेरणीसाठी सरकारने देऊ केलेली, प्रति हेक्टर दहा हजार रुपये ती पण सुद्धा अजून मिळाली नाही ती कधी मिळेल का मिळणार नाही यामध्ये सुद्धा शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे

हा सरळसरळ शेतकऱ्यांचा अपमान असून, “शेतकरीपूरक सरकार” असल्याचा दावा करणाऱ्या शासनाने प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या विरोधातच काम केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज शेतकरी रब्बी हंगामासाठी बियाणे, खत आणि इंधनाच्या वाढलेल्या भावामुळे अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाची मदत मिळाली नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे.

शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दिवाळी अजूनही काळोखातच आहे! असे या परिसरातील शेतकरी बोलत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!