जयंतीधर्मबुलढाणाभगवान बाबाभगवानगडसिंदखेड राजा

श्रद्धेचे अखंड तीर्थ – संतश्रेष्ठ भगवान बाबा : वझर आघाव येथे पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह

संपूर्ण महाराष्ट्राचे, विशेषतः बुलढाणा जिल्ह्याचे श्रद्धास्थान

श्रद्धेचे अखंड तीर्थ – संतश्रेष्ठ भगवान बाबा : वझर आघाव येथे पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह

         प्रतिनिधी | उपसंपादक श्री रघुनाथ आघाव

संपूर्ण महाराष्ट्राचे, विशेषतः बुलढाणा जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेले राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोणार तालुक्यातील वझर आघाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे अत्यंत भव्य व भक्तिभावपूर्ण आयोजन करण्यात आले आहे.

दि. ४ जानेवारी ते ११ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या सप्ताहामुळे संपूर्ण गावासह परिसरातील वातावरण भक्तिरसाने भारून जाणार आहे.

सप्ताहाची सुरुवात दि. ४ जानेवारी रोजी संत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त भव्य दिंडी सोहळ्याने होणार आहे. टाळ–मृदंग, ढोल–ताशांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात निघणारी ही दिंडी संपूर्ण गावातून मार्गक्रमण करणार असून, मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक सहभागी होणार आहेत.

या अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प. कृष्णानंद महाराज मुंडे यांच्या वाणीतून दररोज शिवमहापुराण कथेचे रसाळ निरूपण होणार आहे. तसेच दररोज रात्री ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांची प्रेरणादायी हरिकर्तने होणार असून त्यामध्ये

ह.भ.प. प्रतिक्षा ताई जाधव, ह.भ.प. मुकुंद महाराज गात, ह.भ.प. रामरतन महाराज कांगणे, ह.भ.प. दत्ता महाराज मळवंडीकर, वाघ गुरुजी, ह.भ.प. उद्धव महाराज चोले तसेच ह.भ.प. श्रीहरी महाराज बाहेकर यांचा सहभाग लाभणार आहे.

सप्ताहाची सांगता दि. ११ जानेवारी रोजी ह.भ.प. कृष्णानंद महाराज मुंडे (बीड) यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार असून, त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

संतश्रेष्ठ भगवान बाबा हे केवळ एक नाव नसून लाखो भाविकांची श्रद्धा, विश्वास आणि आध्यात्मिक ऊर्जा आहेत.

तरी या पावन हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!